Honey Singh Divorced From Wife Shalini Talwar After 11 Yrs Of Marriage Pays This Whopping Amount As Alimony

0
9


Honey Singh Divorced : आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय गायक ‘यो यो हनी सिंह’चा (Yo Yo Honey Singh) घटस्फोट झाला आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनीसोबत घटस्फोट घेतला आहे. 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता. 

हनीने शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप त्याची पत्नी शालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 2011 साली हनी सिंह शालिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांची लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आता लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. 

हनी सिंहकडे पत्नीने मागितली 10 कोटींची पोटगी

हनी सिंहकडे पत्नीने एक कोटींची पोटगी मागितली आहे. 20 मार्च 2023 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पत्नीने आरोप लावल्यानंतर हनी सिंह म्हणाला होता, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. या आरोपांमुळे मला अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


हनी सिंह अचानक झाला होता गायब…

हनी सिंह त्याच्या गाण्यांसोबत त्याच्या स्टाईलमुळेदेखील चर्चेत असतो. नेहमी चर्चेत असणारा हनी सिंह तब्बल 18 महिने कोणत्याही अल्बम किंवा सिनेमातील गाण्यात दिसला नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधान आलं. तो ड्रग्जच्या आहारी गेला असल्याचंदेखील सांगण्यात आलं. पण त्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं आणि आपण बायपोलर जिसऑर्डरने त्रस्त असल्याचं त्याने सांगितलं.  

संंबंधित बातम्या

HBD Yo Yo Honey Singh : कधीकाळी कामासाठी इंग्लंडमध्ये भटकला, भारतात येऊन ‘रॅप किंग’ बनला! वाचा हनी सिंहबद्दल…

Honey Singh Accused: यो यो हनी सिंहच्या अडचणीत वाढ, पत्नीची तक्रार, कोर्ट म्हणाले, कुणीही कायद्याच्या वर नाही 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here