Kajol Will Debut In OTT World Through The Good Wife Teaser Out

0
9


The Good Wife : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. आता काजोल ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची ‘द गुड वाइफ’ (The Good Wife) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘द गुड वाइफ – प्यार, कानून, धोका’ (The Good Wife- Pyaar, Kanoon, Dhoka) या वेबसीरिजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन वेबसीरिजचं भारतीय रुपांतर आहे. काजोलने जुलै महिन्यात एक व्हिडीओ शेअर करत या वेबसीरिजची घोषणा केली होती. 


काजोलने ‘द गुड वाइफ’ या वेबसीरिजची घोषणा केल्यापासून ही वेबसीरिज चर्चेत आहे. प्रेक्षक या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी या वेबसीरिजचा टीझर शेअर करत काजोलचा फर्स्‍ट लुकदेखील रिलीज केला आहे. 2009 मध्ये या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली असून 2016 मध्ये शूटिंग पूर्ण झालं आहे. 

‘द गुड वाइफ’ या वेबसीरिजमध्ये काजोलचा एक सामान्य गृहिणी ते वकीलापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. काजोलचा संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीझरमुळे आता काजोलच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये जुलियाना मागुलीस मुख्य भूमिकेत आहे. 

संबंधित बातम्या

Thank God Trailer : ‘गेम ऑफ लाईफ’; थँक गॉड चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर रिलीज

Sita Ramam : ‘सीता रामम’ ओटीटीवर होणार रिलीज; घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहा चित्रपट

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here