Princess Diana Trends After Queen Elizabeth’s Death, Know Who She Was…

  0
  8


  Princess Diana: ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे. त्यांनी तब्बल 70 वर्ष ब्रिटनवर राज्य केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर प्रिन्सेस डायना ट्रेंड करत आहे. कोण होत्या प्रिन्सेस डायना? त्यांचं आणि महाराणी एलिझाबेथ यांचं नातं काय, याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

  कोण होत्या प्रिन्सेस डायना? 

  पार्क हाऊस, सँडरिंगहॅम, नॉरफॉक येथे 1 जुलै 1961 रोजी जन्मलेल्या प्रिन्सेस डायना या प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्स यांची पहिली पत्नी होती. सामान्य लोकांच्या राणी म्हणूनही त्यांना जगभरात ओळखलं जायचं. डायना यांचा 31 ऑगस्ट 1997 रोजी कार अपघातात मृत्यू झाला.

  डायना या जेव्हा 9 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. या घटनेनंतर त्यांचा असा समाज झाला की, आपण कधीही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही, अन्यथा आपल्यालाही याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. डायना या फक्त 16 वर्षांच्या असताना त्यांची पहिल्यांदा प्रिन्स चार्ल्स यांच्याशी भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स हे डायना यांची बहीण सारा यांना डेट करत होते. चार्ल्स हे डायना यांच्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठे होते. पुढे डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या गाठीभेटी वाढल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा शाही विवाहसोहळा सेंट पॉल कॅथेड्रल चर्च येथे पार पडला. त्यावेळी त्यांच्या विवाहसोहळ्याला 3,500 पाहुण्यांची उपस्थिती होती. तर लाखोंच्या संख्येने लोक हा विवाहसोहळ्या टेलिव्हीजनवर पाहत होते.

   

   

     Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here