Thank God Trailer Out Watch Starring Ajay Devgn Sidharth Malhotra Movie Thank God Trailer Video

0
10


Thank God Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अजयसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, या चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारत आहे. अजय हा सिद्धार्थसोबत ‘गेम ऑफ लाईफ’ खेळणार आहे, असंही ट्रेलरमध्ये दिसत आहे. 

अभिनेत्री नोरा फतेही ही देखील थँक गॉड चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमधील तिच्या ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. थँक गॉड चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारणार आहे तर सिद्धार्थ हा अशा एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याच्यासोबत चित्रगुप्त हा गेम ऑफ लाईफ खेळणार आहे.  प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. थँक गॉड या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरे, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंड अधिकारी यांनी केली असून यश शाह सहनिर्माते आहेत. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थनं सोशल मीडियावर या थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. सिद्धार्थच्या पोस्टला लाईक आणि कमेंट करुन त्याच्या चाहत्यांनी त्याला थँक गॉड चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  चित्रपटामधील सिद्धार्थ आणि रकुलची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पाहा ट्रेलर: 

अजयचे आगामी चित्रपट

अजयच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अजय त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.  थँक गॉडसोबत अजयचे चाणक्य, दृश्यम 2,  मैदान, रेड 2 आणि सिंघम 3 हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या सिंघम, दृष्यम, तान्हाजी आणि आरआरआर या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here