Brahmastra Box Office Collection Brahmastra Box Office Collection To Cross 100 Crore Mark This Weekend Ready To Make Record Breaking Earnings

0
8


Brahmastra Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) सिनेमामुळे चर्चेत आहेत. 9 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आला आहे. एकीकडे अनेक बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत असताना ‘ब्रम्हास्त्र’ मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 36 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 75 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या ‘ब्रम्हास्त्र’ची एक वेगळीच क्रेझ सिनेप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 


‘ब्रम्हास्त्र’ची रेकॉर्डब्रेक कमाई!

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत होते. यात अनेक सेलिब्रिटींच्या बिग बजेट सिनेमांचा समावेश होता. त्यातच ‘बॉयकॉट हॅशटॅग’चा फटका निर्मात्यांना बसला. त्यामुळे ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

‘ब्रम्हास्त्र’ने मोडला ‘बाहुबली’चा रेकॉर्ड

मीडिया रिपोर्टनुसार, ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाने ‘बाहुबली’ सिनेमाचादेखील रेकॉर्ड मोडला आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 73 कोटींची कमाई केली होती. तर ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाने 75 कोटींची कमाई केली आहे. ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra Leaked Online : ‘ब्रम्हास्त्र’ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक

Brahmastra Review : उत्कृष्ट व्हीएफएक्स पण कंटाळवाणे सादरीकरण

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here