Brahmastra Box Collection Brahmastra Crosses 100 Crore Mark On Day Two Of Release 160 Crores Worldwide

0
8


Brahmastra Box Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ओपनिंग डे’ला या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने जगभरात 85 कोटींची कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 160 कोंटीचा गल्ला जमवला आहे. 

410 कोटींच्या बजेटमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमावर या सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी गेली 10 वर्ष मेहनत घेत होते. आता ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता अयान मुखर्जींच्या मेहनतीचं चीज झाल्याचं दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. 


‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईबद्दल जाणून घ्या…

‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 85 कोटींची कमाई केली. तर या सिनेमाच्या हिंदी वर्जनने रिलीज्या पहिल्या दिवशी 32 कोटी तर दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांत या सिनेमाने 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची झलकदेखील सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातील ‘केसरिया’, ‘देवा देवा’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अयान मुखर्जीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra Box Office Collection : आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्रची बॉक्स ऑफिसवर जादू; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

Brahmastra : बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा धमाका; आलियानं प्रेक्षकांचे मानले आभार, म्हणाली…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here