Brahmastra Box Office Collection Day 2 Ranbir Kapoor Alia Bhatt Movie

0
9


Brahmastra Box Office Collection : अभिनेता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ब्रम्हास्त्र (Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला तसेच चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (10 सप्टेंबर) देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत…

बॉक्स ऑफिस कलेक्शन

ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या  दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रनं बॉक्स ऑफिसवर जवळपास 42 कोटींचे कलेक्शन केलं आहे. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं एकूण 79 कोटींची कमाई केली आहे. 

जगभरातील बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रचा धुमाकूळ  

ब्रह्मास्त्र या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल, असं म्हटलं जात आहे. 

तगडी स्टार कास्ट

चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दीपिकानं या चित्रपटानं रणबीरच्या आईची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील ‘केसरिया’, देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते.  या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here