Grandparents’ Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

  0
  8


  Grandparents’ Day 2022 : पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई-वडिलांपेक्षाही लहान मुलांना जवळचे वाटणारे आजी आजोबा आज त्यांचा दिवस. आजी-आजोबा खूप लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात. आजी-आजोबाही त्यांच्या जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडांना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रँड पॅरेंट्स डे (Grandparents Day 2022) साजरा केला जातो. हा दिवस आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बंध साजरा करतो.

  दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 11 सप्टेंबर 2022 रोजी साजरा केला जात आहे. ज्याप्रमाणे मदर्स डे आणि फादर्स डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ग्रॅड पॅरेंट्स डे देखील साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करातत. त्यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक भेटवस्तू देऊन आजी-आजोबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.     

  मुलांच्या आयुष्यातील आजी-आजोबांचं महत्त्व : 

  खरंतर लहान मुलांच्या आयुष्यात आजी-आजोबांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण मुलांना जेव्हा बोलताही येत नाही तेव्हापासून आजी आजोबा त्यांच्या बरोबर असतात. त्यांना बोलायला, चालायला, कसं वागावं आणि कसं वागू नये या गोष्टी शिकवतात. त्याचप्रमाणे लहान मुलं अनेक गोष्टी मोठ्यांकडून शिकतात. त्यांचं अनुकरण करतात. लहान मुलांना संस्कार शिकवण्यापासून ते त्यांना भावनिक आधार देण्यापर्यंत आजी आजोबांचं मुलांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे. 

  अमेरिकेत या दिनाची विशेष आठवण : 

  हा दिवस अमेरिकेत साजरा केला जातो कारण या ठिकाणी मॅरियन मॅकक्वेड नावाची एक आजी होती. ज्यांना 43 नातवंडे होती. आजीची इच्छा होती की आजी-आजोबा आणि नातवंडांचे नाते चांगले असावे. प्रत्येकजण एकमेकांसोबत वेळ घालवतो. यासाठी त्यांनी 1970 मध्ये मोहीम सुरू केली. तिला हा दिवस राष्ट्रीय सुट्टी बनवायचा होता, जेणेकरून सर्व मुलांना त्यांच्या आजी-आजोबांसोबत वेळ घालवता येईल. मुले आणि वडील यांच्यातील जनरेशन गॅप संपवावी अशी तिची इच्छा होती. मॅरियन मॅकक्वेड यांनी 9 वर्ष ही मोहीम राबवली. ज्याचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी 1979 हा दिवस ग्रँड पॅरेंट्स डे म्हणून घोषित केला. एज यूके नावाच्या धर्मादाय संस्थेने 1990 मध्ये पहिल्यांदा ग्रँड पॅरेंट्स डे साजरा केला.

  वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो ग्रँड पॅरेंट्स डे :

  ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ अनेक देशांमध्ये वर्षभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. अमेरिकेत, हा दिवस कामगार दिनानंतरचा पहिला रविवार म्हणून साजरा केला जातो. जो सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. तसेच, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, हाँगकाँग, जपान, फिलीपिन्स, पोलंड आणि इतर देशांमध्ये वर्षभरात वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा केला जातो.   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here