Hrithik Roshan Reacts Angrily After Fan Forcefully Tries To Take Selfie Video Viral

0
8


Hrithik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (9 सप्टेंबर) रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकरांनी हजेरी लावली होती. करीना कपूर (Kareena Kapoor), हृतिक रोशन (Hrithik Roshan) हे कलाकार ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. स्क्रिनिंग झाल्यानंतर  हृतिक जेव्हा त्याच्या गाडी जवळ उभा होता तेव्हा एका चाहत्यावर तो भडकला. 

स्क्रिनिंगला  हृतिकनं त्याच्या मुलांसोबत हजेरी लावली.  स्क्रिनिंग झाल्यानंतर ह्रतिक आणि त्याची मुलं गाडी जवळ उभ होती. तेव्हा  हृतिकच्या एका चाहत्यानं  हृतिकसोबत जबरदस्ती सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी  हृतिक त्याच्या चाहत्यावर भडकलेला दिसत आहे. त्या चाहत्याला  हृतिक म्हणाला, ‘हे काय करत आहेस तू?’ त्यानंतर   हृतिक त्याच्या गाडीमध्ये बसला. 

पाहा व्हिडीओ: 
 हृतिकच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिल, ‘जेव्हा कलाकार त्याच्या मुलांसोबत असेल, तेव्हा त्याची रिस्पेक्ट करा.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘त्या व्यक्तीचं चुकलं आहे.’
 
हृतिकचा लवकरच विक्रम वेधा हा चित्रपट रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये  हृतिकसोबतच सैफ अली खान हा हटके अंदाजात दिसला. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘विक्रम वेधा’ या अ‍ॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Brahmastra : बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा धमाका; आलियानं प्रेक्षकांचे मानले आभार, म्हणाली…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here