Salman Khan Trouble Rises The Shooter Reveals That He Is On The Gangster Target

0
11


Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. 

पंजाबचे डीसीपी गौरव यादव म्हणाले,” सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला शूटर कपिल पंडितने खुलासा केला आहे की, त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या हालचालींवर लक्ष देण्याचं काम दिलं होतं.” जून महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्रं मिळालं होतं. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. 

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान सध्या बुलेटप्रूफ गाडीतूनच प्रवास करत आहे. तसेच त्याला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे. सेटवरदेखील सुरक्षारक्षकांत वाढ करण्यात आली आहे. सलमान सध्या गर्दीच्या कार्यक्रमांना जाण्याचं टाळत आहे. 

सलमानचा ‘गॉड फादर’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याने अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. सलमानचा ‘गॉड फादर’ सिनेमातील लुकदेखील समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. तसेच ‘बिग बॉस 16’देखील लवकरच सुरू होणार आहे. ‘बिग बॉस 16’ सलमान होस्ट करताना दिसून येणार आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan Security : बंदुकीचा परवाना अन् बुलेटप्रूफ गाडी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा

Siddhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला प्रकरणात मोठी अपडेट; तीन शूटर्सना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here