Urfi Netizens Target For Heart Cut Dress Urfi Javed Video Video Get Viral

0
7


Urfi Javed Video : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीचा नवा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीची हटके स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

नव्या लुकमध्ये उर्फीने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट असलेला टॉप परिधान केला आहे. उर्फीचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा नव्या लुकमधील व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. उर्फीच्या नव्या लुकवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एकीकडे उर्फीचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे नेटकरी उर्फीला ट्रोल करताना दिसत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी म्हणत आहे,”एवढ्या उन्हात तू हुडी घालून आलीस? तुला पाहून मलाच घाम फुटलाय. मी कमी कपडे घालते म्हणून तू जास्त कपडे घातलेत का? मुंबईत एवढी थंडी नसते.” उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडीओमुळे उर्फीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. 


उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच तिचे हटके लुक शेअर करत असते. पण यंदा मात्र उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलिंगचा सामना करतानादेखील उर्फी लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच उर्फी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. उर्फी जावेद 40 ते 55 लाखांच्या संपत्तीची मालकीण आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी उर्फी 25 ते 35 हजार मानधन घेते. 

संबंधित बातम्या

Urfi Javed : गणपती बाप्पाच्या भक्तीत रममाण झाली उर्फी जावेद! सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ…

Urfi Javed : उर्फी जावेदचा फोटो मॉर्फ करणाऱ्या तरुणाला अटक; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here