Anil Kapoor And Varun Dhawan Will Participate In The Upcoming Episode Of Koffee With Karan Promo Out

0
7


Koffee With Karan 7 : सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरुण धवन (Varun Dhawan) सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर अनिल आणि वरुण अनेक रहस्यांचा उलगडा करताना दिसणार आहे. 

‘कॉफी विथ करण’च्या मंचावर वरुण अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. वरुणला कतरिना आणि दीपिकासोबत काम करायला आवडत नाही. कतरिना आणि दीपिका वरुणला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या वाटतात. रिपोर्टनुसार, कतरिनाचं वय 39, दीपिका पदुकोणचं वय 36 आहे. तर वरुण धवन 35 वर्षांचा आहे. 

करणच्या प्रश्नांवर वरुणचं भन्नाट उत्तर

प्रोमोमध्ये करण वरुणला विचारताना दिसतोय की, सेल्फी काढायला कोणाला आवडतं? यावर वरुण म्हणतो, अर्जुन कपूरला. करण दुसरा प्रश्न विचारतो, गॉसिप करायला कोणाला आवडतं?  यावर उत्तर देत वरुण पुन्हा अर्जुन कपूरचं नाव घेतो. करण शेवटचा प्रश्न विचारतो, सर्वाच जास्त फ्लर्ट कोण करतं? यावरदेखील वरुण अर्जुन कपूरचचं नाव घेतो. यावर अनिल कपूर म्हणत आहे, काय झालयं काय तुला..थांबव आता…माझा भाचा आहे तो…”


‘कॉफी विथ करण’च्या आगामी भागात प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन होणार आहे. करण जोहरचे प्रश्न आणि अनिल कपूर, वरुण धवनची भन्नाट उत्तरं प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. नुकताच ‘जुग जुग जियो’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात वरुण धवन अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आला होता. या दोघांसह नीतू कपूर आणि कियारा आडवानीदेखील सिनेमात मुख्य भूमिकेत होते. 

वरुण धवन झळकणार ‘भेडिया’ सिनेमात 

वरुण धवनचा ‘भेडिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमर कौशिकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या सिनेमाचं कथानक नीरेन भट्टने लिहिलं आहे. या सिनेमात कृती सेनन, अभिषेक बॅनर्जी, दीपक डोबरियाला आणि पालीन कबाक मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Koffee With Karan 8 : ‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व होणार सुरू; लवकरच होणार घोषणा

Koffee With Karan 7: कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडचा मजेशीर प्रोमो रिलीज; ईशान, सिद्धांत अन् कतरिना करणार धमाल!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here