Happy Birthday Prachi Desai Know About Actress Career Journey Tv To Bollywood

0
8


Prachi Desai Birthday : एकता कपूरची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कसम से’ मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) ही बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी टेलिव्हिजनच्या जगापासून सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीने यश मिळवले आहे. आज (12 सप्टेंबर) अभिनेत्री प्राची देसाई आपला वाढदिवस साजरा करत आहे. प्राची देसाईचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये झाला. सुरतमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राची पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली.

प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयाची गोडी होती. म्हणून पुण्यात आल्यावर तिने अभिनयात नशीब आजमावण्याचा विचार केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी प्राचीला एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत प्राची तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठा असलेल्या राम कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. 2006 मध्ये प्रसारित झालेल्या ‘कसम से’ या मालिकेतील बानी कपूरच्या व्यक्तिरेखेतील प्राचीचा साधेपणा सर्वांनाच आवडला आणि ती घरोघरी लोकप्रिय झाली. प्राची देसाईने केवळ दोन मालिकांमध्ये काम केले. यानंतर तिला 2008मध्ये फरहान अख्तरसोबत ‘रॉक ऑन’ या चित्रपटाची ऑफर मिळाली.

शाहिद आणि हृतिकची जबरा फॅन!

शालेय जीवनात प्राची देसाई (Prachi Desai)  शाहिद कपूरची खूप मोठी चाहती होती. मात्र, नंतर तिला हृतिक रोशन आवडू लागला. प्राचीला नेहमी स्वतःहून मोठ्या हिरोसोबत काम करायचं होतं. वयस्क नायक आणि तरुण नायिकेची जोडी चित्रपटांना खूप मनोरंजक बनवते, असे प्राचीचे मत होते.

बॉलिवूडमध्येही गाजवलं नाव!

मालिका विश्वात मिळालेल्या यशानंतर’ प्राचीने मागे वळून पाहिले नाही. लवकरच प्राचीला बॉलिवूडमधूनही चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. ‘रॉक ऑन’ चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर नायक होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर प्राचीच्या हाताला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट लागले, ज्यात तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.

टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत…

‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘जिला गाझियाबाद’, ‘एक व्हिलन’, ‘लाईफ पार्टनर’, ‘बोल-बच्चन’, ‘रॉक ऑन 2’, ‘कार्बन’, ‘फॉरेन्सिक’ अश अनेक चित्रपटांमध्ये प्राची देसाई (Prachi Desai) झळकली आहे. टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी आणि बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्राची देसाई लवकरच नव्या धाटणीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

In Pics | बॉलिवूड अभिनेत्रीला व्हीलचेअरवर पाहून चाहते चिंतातूर

प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here