Satvya Mulichi Satvi Mulgi And Chotya Bayochi Motthi Swapna Two Marathi Serial Coming Soon

0
5


Marathi Serial : मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून नव-नवे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नव्या मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. आजपासून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi) आणि ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna) या दोन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचं कथानक काय? 

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नायिकेला म्हणजेच नेत्राला भविष्यात काय घडणार याचा अंदाज येत असतो. त्यामुळेच ती एक असामान्य मुलगी आहे. पण तरीही तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नेत्रा वर्तमानात आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत आहेत. तर ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारदेखील मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेचं कथानक काय? 

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकरने साकारली आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गूढ रहस्यमय मालिका प्रेक्षकांना आजपासून  (12 सप्टेंबर) सोम-शनि. रात्री 10.30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. तर ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षक सोम-शनि. रात्री साडे आठ वाजता सोनी मराठीवर पाहू शकतात. 

मालिका : सातव्या मुलीची सातवी मुलगी
कुठे पाहू शकता? झी मराठी
किती वाजता? रात्री 10.30 वा. 

मालिका : छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? रात्री 8.30 वा. 

संबंधित बातम्या

Chotya Bayochi Motthi Swapna : ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ’; ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जे घडणार तेच ती बोलणार… ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here