Shivpratap Garudjhep Official Teaser Release Amol Kolhe Movie

0
8


Shivpratap Garudjhep : रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

नुकतीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली. या पोस्टला अमोल कोल्हे यांनी कॅप्शन दिली, ‘आमच्या हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्याचे हात मुळासकट उखडून टाकण्याची धमक आम्ही बाळगतो..!” सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना, ‘शिवप्रताप गरुडझेप’ 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहांत.! आता फक्त 23 दिवस बाकी!’ या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर हा अमोल कोल्हे यांच्या अमोल ते अनमोल या युट्युब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या टीझरला लाइक केलं आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा टीझर : 

‘शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे  गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे संपूर्ण गाणं शेअर केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक आणि कमेंट्स करुन अमोल कोल्हे यांना या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shivpratap Garudjhep : औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेते यतीन कार्येकर; ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाच ऑक्टोबरला होणार रिलीजSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here