Shweta Tiwari Advices Daughter Palak Tiwari Not To Get Married

0
6


Shweta Tiwari : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. श्वेताची  ‘मैं हूं अपराजिता’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  श्वेताचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. श्वेता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्वेतानं तिच्या मॅरेज लाईफबाबत सांगितलं. 

काय म्हणाली श्वेता ? 

एका मुलाखतीमध्ये श्वेतानं सांगितलं, ‘माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. म्हणून मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देते. मी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही विचारत नाही. तिला हवं तसं आयुष्य जगू देते पण मला असं वाटतं की कोणताही निर्णय घेण्याआधी तिनं विचार केला पाहिजे. जर तुम्ही कोणाला तरी डेट करत असाल, तर गरजेचं नाही की तुम्ही लग्न केलं पाहिजे. ‘ 

पुढे श्वेतानं सांगितलं, ‘मी असेल अनेक मित्र पाहिले आहेत, जे लग्न केल्यानंतर आनंदी झाले. पण असे काही लोक आहेत जे तडजोड करत आहेत. म्हणूनच मी माझ्या मुलीला सांगते की तिने दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये. तिने तेच केले पाहिजे जे तिला आनंद देईल.’ 

श्वेतानं दोन वेळा थाटला संसार 

श्वेतानं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत केलं. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2007 मध्ये श्वेता आणि राजाचा घटस्फोट झाला. 2013 मध्ये श्वेतानं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. 2019 मध्ये श्वेता आणि अभिनव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. श्वेताची मुलगी पलक ही देखील अभिनेत्री आहे. हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यामधून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या गण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ती लवकरच विशाल मिश्रा यांच्या रोजी: द सॅफरन चॅप्टर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here