Soundarya Rajinikanth And Vishagan Blessed With Baby Boy

0
7


Soundarya Rajinikanth Baby : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या घरी नुकतेच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांत (Soundarya Rajinikanth) हिने रविवारी मुलाला जन्म दिला. सौंदर्याने ट्विट करून आपल्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली आहे. या सोबतच तिने काही फोटो शेअर करत लिहिले की, ‘देवाच्या अपार कृपेने आणि आमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने, विशगन, वेद आणि मी आज 11/9/22 रोजी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनंगामुडी यांचे स्वागत करत आहोत.’

रजनीकांत यांची लेक सौंदर्या दुसऱ्यांदा आई झाली आहे. या आधी तिला वेद नावाचा एक मुलगा आहे. सौंदर्याने तीन वर्षांपूर्वी विशगनसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. सौंदर्या रजनीकांतचे (Soundarya Rajinikanth) पहिले लग्न बिझनेसमन अश्विन राम कुमार यांच्याशी झाले होते. परंतु, लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पतीपासून सौंदर्याला एक मुलगा आहे.

पाहा पोस्ट :

सौंदर्या रजनीकांतने तिच्या ट्विटर हँडलवर बाळासोबतचे आणि तिच्या प्रेग्नेंसी शूटचे काही फोटो देखील शेअर केले. सौंदर्या रजनीकांतवर दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. बाळाचे नाव वीर रजनीकांत वनंगमुडी ठेवण्यात आल्याचे सौंदर्याने सांगितले. मात्र, त्यांनी त्यांच्या नवजात बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.

दुसऱ्यांदा झाली आई!

पहिले लग्न मोडल्यानंतर सौंदर्याने 11 फेब्रुवारी 2019 रोजी एका भव्य समारंभात विशगन वनंगमुडीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांनी आपल्या बाळाचे स्वागत केले आहे. दुसऱ्यांदा आई झालेल्या सौंदर्याने (Soundarya Rajinikanth) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवजात बाळाची झलक शेअर केली आहे.

‘थलायवा’ रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ती व्यवसायाने ग्राफिक डिझायनर, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत सौंदर्या रजनीकांत हिचे नाव नेहमी चर्चेत असते. सौंदर्याने वडील रजनीकांत यांचा ‘कोचादैयान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होता. याशिवाय तिने धनुषचा ‘वेलायला पट्टाधारी 2’ हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. या आधी तिने अनेक चित्रपटांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले आहे.

संबंधित बातम्या

Jailer : थलैवा ‘रजनीकांत’च्या ‘जेलर’ सिनेमाचे पोस्टर आऊट; लवकरच शूटिंगला करणार सुरुवात

Rajinikanth : रजनीकांत ठरले ‘हायेस्ट टॅक्स पेयर’; तमिळनाडू इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून सन्मान, ऐश्वर्याकडून पोस्ट शेअरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here