The Movie Victoria Will Be Released In Theaters On December 16

0
8


Victoria Marathi Movie : मराठी मनोरंजनविश्वात आता ‘व्हिक्टोरिया’ (Victoria) सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीत अशोक (Jeet Ashok) आणि ‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला ‘व्हिक्टोरिया’

‘व्हिक्टोरिया’ या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हीरा सोहल या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर वैशल शाह हे सह निर्माता आहेत. 

16 डिसेंबरला ‘व्हिक्टोरिया’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘व्हिक्टोरिया’ हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुष्कर जोगचा सोनाली कुलकर्णीसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे. आआधी ‘ती आणि ती’ , ‘तमाशा लाईव्ह’ या सिनेमांत पुष्कर-सोनालीची जोडी दिसून आली होती. 


‘व्हिक्टोरिया’ या सिनेमाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमध्ये पूर्ण झालं आहे. विराजसने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. विराजसने लिहिलं होतं,”It’s Wrap For व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्तांच्या धारांमधून आमची debut horror film तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आली आहे”. 

संबंधित बातम्या

Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… ‘व्हिक्टोरिया’साठी विराजसची खास पोस्ट!

Victoria Marathi Film : कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसल्या जखमा, रहस्यमयी ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील थरारक लूक पाहिलेत?

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here