Brahmastra Box Office Collection Day 4 Know About Ranbir Kapoor And Alia Bhatt Movie Collection

0
9


Brahmastra Box Office Collection Day 4 :  अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या  ब्रह्मास्त्र (Brahmastra)  या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनबाबत…

चौथ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
सोमवारी (12 सप्टेंबर) म्हणजेच चौथ्या दिवशी ब्रह्मास्त्र या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 16 कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं  45 कोटी कमावले. चार दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 140 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 

काहींना आवडला तर काहींची नापसंती 

अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे.  चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि  मौनी रॉय या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  ब्रह्मास्त्र या चित्रपटातील ‘केसरिया’, देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. 

बॉयकॉट हॅशटॅग झाला होता ट्रेंड

ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेक नेटकरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होते. या ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होईल, असं म्हटलं जात होतं. पण चित्रपटाच्या कलेक्शनवर या ट्रेंडचा परिणाम झाला नसून चित्रपट सध्या कोट्यवधींची कमाई करत आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here