T20 World Cup Record Know Top 10 Most Wicket Takers In ICC T20 World Cup From 2007 To 2021 

  0
  7


  T20 World Cup Record : आयसीसी टी20 2022 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे पार पडत आहे. आगामी विश्वचषकासाठी जवळपास बहुतांश सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले असून बीसीसीआयकडूनही नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. यावेळी संघात बुमराह आणि हर्षल परतल्याने भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे म्हणा… पण नेमकी भारतीय गोलंदाजी कशी कामगिरी करेल हे विश्वचषकच ठरवेल. तर यंदाच्या विश्वचषकाआधी टी20 वर्ल्डकपमधील गोलंदाजी रेकॉर्ड्सचा विचार केला तर टॉप 10 मध्ये केवळ एक भारतीय आहे तो म्हणजे आर. आश्विन (R Ashwin). आश्विन यंदाच्या टी20 स्कॉडमध्येही असल्यानं त्याच्याकडून यंदाही संघाला अपेक्षा असतील. तर आतापर्यंतच्या म्हणजेच 2007 पासून ते 2021 पर्यंतच्या टी20 विश्वचषकांच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू कोण? ते पाहूया…

  तर या यादीत एक नंबरला असणारा खेळाडू हा फुलटाईम बोलर नसून एक अष्टपैलू क्रिकेटर शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) हा आहे. पहिल्या विश्वचषकापासून म्हणजेच 2007 पासून 2021 चाही विश्वचषक खेळलेल्या शाकिबनं 31 सामन्यातील 30 डावांत 6.43 च्या इकॉनॉमीनं 41 विकेट्स नावावर केले आहेत. तो या यादीत अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या नंबरवर पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) असून त्याने 2007 पासून ते 2016 पर्यंत 34 सामन्यातील 31 डावात  6.71 च्या इकॉनॉमीनं 39 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या नंबरवर श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) असून त्याने 31 सामन्यातील 31 डावांत 7.43 च्या इकॉनॉमीनं 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर सईद अजमल, मेन्डीस, उमर गुल, डेल स्टेन, स्टुवर्ट ब्रॉड, डीजे ब्राव्हो यांच्यासह10 व्या स्थानी रवीचंद्रन आश्विन याचा नंबर लागतो.

  टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-10 गोलंदाज:
  क्रमांक गोलंदाजांचं नाव संघ सामने विकेट्स
  1 शाकीब अल् हसन बांग्लादेश 31 41
  2 शाहीद आफ्रिदी पाकिस्तान 34 39
  3 लसिथ मलिंगा श्रीलंका 31 38
  4 सईद अजमल पाकिस्तान 23 36
  5 अजंता मेंडिस श्रीलंका 21 35
  6 उमर गुल पाकिस्तान 24 35
  7 डेल स्टेन दक्षिण आफ्रिका 23 30
  8 स्टुवर्ट ब्रॉड इंग्लंड 26 30
  9 डीजे ब्राव्हो वेस्ट इंडीज 34 27
  10 आर. आश्विन भारत 18 26

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here