Vijay Deverakonda Shares First Instagram Post After Liger Flop

0
9


Vijay Deverakonda : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट फ्लॉप ठरला. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. आता लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजयनं पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला विजयनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 

विजयची पोस्ट
विजयनं सोमवारी (12 सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये  दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 साठी केलेल्या लूकमध्ये विजय दिसत आहे. या पोस्टला विजयनं कॅप्शन दिलं, ‘सिंगल प्लेअर’ 

विजयच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस 
विजयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं लिहिलं, ‘तू फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेशील’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, ‘तुझा चित्रपट हिट किंवा फ्लॉप झाला तरी तुला प्रेक्षकांची पसंती मिळणार आहे.’ तर ‘वन मॅन आर्मी’ अशी कमेंट विजयच्या एका चाहत्यानं केली आहे. 

पाहा विजयची पोस्ट :


विजय देवरकोंडानं लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 25 ऑगस्ट रोजी लायगर हा चित्रपट रिलीज झाला. पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मे कौर यांनी 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये लायगर चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबतच रोनित रॉय, रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि विश रेड्डी या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी ‘लायगर’ या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Vijay Deverakonda : लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय; मानधनातील सहा कोटी निर्मात्यांना करणार परत!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here