Pakistani Actress Resham Did Big Mistake While Feeding Fish Trolled On Social Media

0
10


Pakistani Actress Resham Troll : पाकिस्तानी अभिनेत्री रेशमचा (Resham) चाहता वर्ग मोठा आहे. रेशम ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रेशम ही अनेक वेगळा गरजू लोकांना मदत करते, त्यामुळे ती चर्चेत असते. नुकताच रेशमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेशम ही माशांना खाद्य देताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेशमला ट्रोल केलं आहे. 

नेटकऱ्यांनी का केलं रेशमला ट्रोल? 
व्हायरल व्हिडीओमध्ये रेशम ही माशांना खाद्य पदार्थ देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती काही ब्रेडचे तुकडे पाण्यात टाकताना दिसत आहे. ज्या प्लास्टिक बॅगमध्ये ब्रेड ठेवलेला आहे तिच बॅग रेशम पाण्यामध्ये टाकते. ‘रेशम ही नेहमी लोकांची मदत करते पण तिनं एक चुक केली आहे. तिनं हे जाणूनबुजून केले नाही. पण रेशमनं जे केलं ते तुम्ही करु नका.’  अनेक नेटकऱ्यांनी रेशमच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन ट्रोल केलं आहे. 
 
 व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
रेशमच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं कमेंट केली, ‘दिखावा करु नका’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘म्हणून असं म्हटलं जात, प्रत्येक कामाचा दिखावा करणं गरजेचं नाहीये.’ ‘तुमच्याकडून खूप मोठी चुक झाली आहे.’ अशी कमेंट एका युझरनं केली. 
 
व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली

रेशमनं  तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं की, ‘माझ्या करिअरमधील ही सर्वात मोठी चुक आहे.’

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Entertainment News Live Updates 15 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here