World Ozone Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

  0
  8


  World Ozone Day 2022 : ओझोन दिन हा पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लोकांना ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिन’ दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. वातावरणातील ओझोनचे सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो.

  दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन (Ozone day) साजरा केला जातो. ओझोन थराबद्दल (Ozone layer) लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी हा उपाय साजरा केला जातो. ओझोन हा ऑक्सिजन वायूच्या 3 अणूंचं संयुग आहे. जो वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो. ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्‍या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून (The rays of the sun) पृथ्वीचे (Earth) रक्षण करते. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.

  19 डिसेंबर 1994 रोजी जागतिक ओझोन दिनची झाली घोषणा 

  19 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत  (UNGA)16 सप्टेंबरला ओझोन थरा संरक्षण आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केलं. 16 सप्टेंबर 1987 रोजी, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या. ओझोन थर कमी होण्यास जबाबदार असलेल्या पदार्थांचे उत्पादन कमी करून ओझोन थरचे संरक्षण करण्याचे लक्ष्य मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे आहे. 16 सप्टेंबर 1995 रोजी जागतिक ओझोन दिन प्रथमच साजरा करण्यात आला.

  ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्‍या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून (The rays of the sun) पृथ्वीचे (Earth) रक्षण करते. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.

  संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) 1995 सालापासून हा दिवस पाळला जातो. 1978 साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी 2010आणि 2030 या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.

  महत्वाच्या बातम्या :   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here