Entertainment News Celebrity Diary Of Utkarsh Shinde Know With Who They Wants To Work With Next

0
6


Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखादा सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. ‘सेलिब्रिटी डायरी’च्या माध्यमातून जाणून घ्या डॉ. उत्कर्ष शिंदेच्या (Utkarsh Shinde) गॅलरीतला शेवटचा स्कीनशॉटपासून त्याला कोणता रिॲलिटी शो करायला आवडेल?

‘मैत्री’ हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?

– जय, मीरा, सुरेखा ताई, अक्षय

कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

– डान्स रिअॅलिटी शो

पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?

– सचिन पिळगावकर

भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?

– हो.. लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या भावाचे अनेकदा कपडे शेअर केले आहे. 

गॅलरीतला शेवटचा फोटो


स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?

– पोहे, गाजर हलवा, ऑम्लेट, पोळी उत्तम बनवता येते. 

आवडता खाद्यपदार्थ?

– गाजर हलवा, पुरणपोळी आणि आईच्या हातचं चिकन

कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केला आहे का?

– हो..लोकलने शाळेत असताना एकदा प्रवास केला आहे. लोकलने पहिल्यांदा प्रवास करताना उजव्या आणि डाव्या बाजूच्या मागे एक खांब असतो. हे माहीत नव्हतं. मी त्या खांबाला चिकटून उभा होतो. जेव्हा लोकलमधून खाली उतरलो तेव्हा माझं शर्ट फाटलं होतं. 

मनोरंजन सृष्टीतला आदर्श

– सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे

डॉ. उत्कर्ष शिंदेबद्दल जाणून घ्या…

डॉ. उत्कर्ष शिंदे हा गायक, संगीतकार असण्यासोबत एक उत्तम अभिनेतादेखील आहे. उत्कर्षने ‘हाक मारतयं कोल्हापूर’, ‘गो-करोना, करोना गो’, ‘कोविड योद्धा म्हणा’, ‘आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा’, ‘हळदीचा सोहळा’ अशी अनेक गीते गायली आहेत. बिग बॉसमुळे उत्कर्ष शिंदे घराघरांत पोहचला. सध्या उत्कर्ष ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत उत्कर्ष संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येत असून त्याची साकारलेली संत चोखामेळांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.’

संबंधित बातम्या

Celebrity Diary : ‘आपल्या सिद्धू’ला करायचयं लेखक क्षितिज पटवर्धनच्या दिग्दर्शनाखाली काम; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आवडीचा खाद्यपदार्थ?

Celebrity Diary : ऋतुजा बागवेला करायचंय उमेश कामतसोबत काम; जाणून घ्या तिला कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here