World Patient Safety Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

  0
  6


  World Patient Safety Day 2022 : जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस (World Patient Safety Day) जागतिक स्तरावर 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस रुग्ण, कुटुंब, काळजीवाहू समुदाय, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा यांच्यासाठी साजरा केला जातो.

  जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची थीम (World Patient Safety Day Theme 2022) : 

  यावर्षी, जागतिक रुग्ण सुरक्षा दिनासाठी “औषध सुरक्षा” ही “हानीविना औषध” या घोषवाक्याखाली “जाणून घ्या, तपासा आणि विचारा” या घोषणेसह ही थीम निवडण्यात आली आहे.

  जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा इतिहास (World Patient Safety Day History 2022) :  

  जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सर्वात प्रथम 17 सप्टेंबर 2019 रोजी WHOने आपल्या ठरावावर साजरा करण्याची मान्यता दिली. 25 मे 2019 रोजी 72 व्या जागतिक आरोग्य संमेलनात हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस जागतिक रूग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

  जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा उद्देश (World Patient Safety Day Significance 2022) :  

  जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यामागे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे यापैकी रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल जागतिक समज वाढविणे हा या दिवसामागचा सर्वात मोठा उद्देश आहे. यामध्ये रुग्णांच्या आरोग्यसेवेचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान कमी करण्यासाठी, सार्वजनिक सहभाग वाढविण्यासाठी जागतिक कृतींना प्रोत्साहन देणे देखील समाविष्ट आहे. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेच्या महत्त्वशी संबंधित वस्तुस्थिती बद्दल जागतिक जागरुकता वाढविणे आहे.

  महत्वाच्या बातम्या :   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here