Nene Vasthunna Teaser Will See Dhanush In A Dual Role Teaser Out

0
4


Nene Vasthunna Teaser : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) सध्या त्याच्या आगामी ‘नेने वस्थुन्ना’ (Nene Vasthunna) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे. 

‘नेने वस्थुन्ना’ या सिनेमात धनुषचा रावडी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच थरार नाट्यदेखील पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. टीझर फ्लॅशबॅगमध्ये जाणारा आहे. ‘नेने वस्थुन्ना’ या सिनेमाची बांधणी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे याचा ट्रेलरवरून अंदाज येतो. 

‘नेने वस्थुन्ना’ 29 सप्टेंबरला होणार रिलीज

ट्रेलर रिलीज झाल्याने धनुषचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. दोन वेगळ्या भूमिका धनुषने चांगल्या पेलवल्या आहेत. ‘धनुष फक्त अभिनयच करत नाही तर ते पात्र जगतो आहे’, ‘धनुष एक अभ्यासू अभिनेता आहे’, टीझरवर चाहते अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ‘नेने वस्थुन्ना’ हा सिनेमा 29 सप्टेंबरला रिलीज होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

धनुषचा जगभरात डंका

धनुषनं द ग्रे मॅन (The Gray Man) या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला. धनुष हा 160 कोटी संपत्तीचा मालक आहे. धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी मानधन घेतो. चेन्नईमध्ये धनुषचे आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 25 कोटी आहे. धनुषकडे रेंज रोव्हर, रॉल्स रॉयस घोस्ट आणि  मर्सिडीज बेंज यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. 

धनुषच्या ‘थिरुचित्रम्बलम’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांचं मन या चित्रपटानं जिंकलं आहे. धनुषच्या नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ग्रे मॅन चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही पण त्याच्या ‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

टीझर पाहा : 

संबंधित बातम्या

Thiruchitrambalam : ‘धनुष’च्या ‘थिरुचित्रम्बलम’ चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

The Gray Man Review : बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here