The Audience Will Be Treated To A Feast Of Entertainment Over The Weekend Marathi Movies Dominate The Box Office

0
6


Boxoffice Movies : गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या आठवड्यात तीन मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. तर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यामुळे प्रेक्षकांना या वीकेंडला मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या वीकेंडला प्रेक्षक ‘ब्रह्मास्त्र’, ‘बॉईज 3’, ‘भाऊबळी’,’रुप नगर के चीते’ हे सिनेमे पाहू शकतात.

ब्रह्मास्त्र (Brahmastra) : 

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. दुसऱ्या आठवड्यातदेखील या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. आलिया-रणबीरसह ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

बॉईज 3 (Boyz 3) : 

‘बॉईज’च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. आता ‘बॉईज 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमातील ‘लग्नाळू 2.0’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. विदुलाचा कमाल अंदाज, सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड या कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला ‘बॉईज 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

भाऊबळी (Bhaubali) : 

‘भाऊबळी’ हा विनोदी सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमात विनोदवीरांची फौज असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, रेशम टिपणीस, प्रियदर्शिनी इंदलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, तुषार घाडीगावकर, शार्दूल सराफ, सचिन भिलारे, आनंद अलकुंटे, विश्वास सोहनी, रसिका आगाशे, विजय केंकरे, श्रीकर पित्रे असे सिनेसृष्टीतील कसलेले, लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खदखदून हसवत आहेत. 

रूप नगर के चीते (Roop Nagar Ke Cheetey) :

‘रूप नगर के चीते’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट ‘रूप नगर के चीते’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Roop Nagar Ke Cheetey : मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट उलगडणार; बहुचर्चित ‘रूप नगर के चीते’चा ट्रेलर रिलीज

Brahmastra Box Office Week 1 Collection : ‘ब्रह्मास्त्र’चा जगभरात डंका; बॉक्स ऑफिसवर पार केला 300 कोटींचा टप्पाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here