Kapil Sharma Upcoming Hindi Movie Zwigato Trailer Release

0
6


Zwigato Trailer: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) टीव्हीपाठोपाठ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल त्याच्या ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील कपिलचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. यामध्ये तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसला होता. आता कपिलच्या या आगामी चित्रपटाचा शानदार ट्रेलरही रिलीज झाला आहे. या चित्रपटात कपिलची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.

लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल शर्मा या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो आयुष्यातील अनेक संकटांना तोंड देताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा ट्रेलर :

आपल्या धमाकेदार कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कपिल शर्मा या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. ‘झ्विगॅटो’चे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यात कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला.

काय आहे या ट्रेलरमध्ये?

या चित्रपटाच्या 1 मिनिट 39 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात एका बिल्डिंगपासून सुरू होतो, जिथे कपिल हा डिलिव्हरी बॉय बनून पिझ्झा घेऊन येतो. पण, अगदी सुरुवातीलाच एक सीन आहे, ज्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, डिलिव्हरी बॉयला इमारतीतील लिफ्ट वापरण्यास मनाई आहे आणि त्यामुळे तो जिने वापरून वर जातो. डिलिव्हरी बॉयच्या समस्या या सीनमधून सांगण्यात आल्या आहेत.

यानंतर, ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी कपिल रात्रंदिवस काम करण्यास तयार आहे. असाच एक सीन ट्रेलरमध्ये येतो, जिथे कपिल म्हणतो की, आज मी 10 डिलिव्हरी करणार आहे. मात्र, जेव्हा कपिलची पत्नी शहाना देखील कामावर जायला सुरुवात करते, तेव्हा कुटुंबात नवीन वाद सुरू होतात. यानंतर सामान्य कुटुंबाप्रमाणे कपिलच्या घरातही वाद सुरू होतो.

काय आहे कथानक?

‘झ्विगॅटो’ ची कथा एका अशा अधिकाऱ्याची आहे, जो एका कंपनीत मॅनेजर आहे, ज्याची नोकरी साथीच्या आजाराच्या काळात गेली आहे. या काळात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो व्यक्ती डिलिव्हरी बॉयचे काम करू लागतो. या चित्रपटातून सामान्य डिलिव्हरी बॉयच्या समस्या मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here