Vikram Vedha Once Doctor Warn Hrithik Roshan Not To Do Dance And Action Movies

0
7


Vikram Vedha : सध्या अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली आहे आणि यातील कलाकार देखील प्रमोशनमध्ये व्यस्त झाले आहेत. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एका ब्रेकनंतर हृतिक रोशन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हृतिकने त्याच्या आयुष्यातील एका मोठ्या घटनेबद्दल सांगितले आहे.

आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या आधीही हृतिक अनेक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन करताना दिसला होता. या प्रमोशन दरम्यान हृतिकने त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेचा उलगडा केला. एकेकाळी डॉक्टरांनी हृतिकला डान्स आणि अ‍ॅक्शन न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या प्रसंगाला घाबरून न जाता हृतिकने प्रचंड मेहनत घेत डॉक्टरांच्या या वक्तव्याला चुकीचे सिद्ध केले.

आव्हान म्हणून स्वीकारलं!

या घटनेबद्दल बोलताना हृतिक रोशनने सांगितले की, ‘कहो ना प्यार है’ चित्रपटापूर्वी डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की, तू डान्स आणि अॅक्शन चित्रपट करू शकणार नाहीस. तुझे शरीर त्यासाठी सक्षम नाही. हृतिक म्हणाला, ‘मी डॉक्टरांचे हे बोलणे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि असे चित्रपट करण्यासाठी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सुरुवात केली. डॉक्टरांच्या तंबीनंतरही 25 चित्रपटांमध्ये डान्स करणं, अॅक्शन करणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.’

साऊथ चित्रपटाचा रिमेक

‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

एकाचवेळी 100 देशांमध्ये प्रदर्शित होणार!

सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!

Hrithik Roshan : ह्रतिकचा ‘विक्रम वेधा’ मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here