Pauline Jessica Death Tamil Actor Deepa Aka Pauline Jessica Suicide Died

0
6


Pauline Jessica : तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पॉलिन जेसिकाचा (Pauline Jessica) मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीमध्ये शोककळा पसरली आहे. 18 सप्टेंबर रोजी चेन्नईमधील (Chennai) विरुगमबक्कम मल्लिका अवेन्यूमध्ये पॉलिन जेसिकाचा मृतदेह अढळला. पॉलीन जेसिका ही मूळची आंध्र प्रदेशची आहे. पॉलिन जेसिकानं वैधा (Vaidha) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. त्याचबरोबर पॉलिन जेसिकानं तमिळ चित्रपट आणि सिरीयलमध्ये काम केलं आहे. दीपा मायस्किन दिग्दर्शित ‘थुप्परीवलन’ या हिट चित्रपटात तिनं काम केलं होतं. 

पॉलिन जेसिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला
कोयंबेडू पोलिसांना पॉलिन जेसिकाच्या शेजाऱ्यांकडून तिच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर  रविवारी (18 सप्टेंबर) पॉलिनचा मृतदेह पोलिसांना तिच्या घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अढळला. पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी पॉलीन जेसिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी किलपॉक शासकीय रुग्णालयात पाठवला. यानंतर  पॉलीन जेसिकाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.  तिचा मृतदेह आंध्र प्रदेशला पाठवण्यात आला. पोलिसांनी माहिती दिली की, ‘आम्ही लोकप्रिय अभिनेत्री पॉलिन जेसिकाच्या कथित आत्महत्येचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि आम्ही त्यासाठी सीसीटीव्हीमधील फूटेजचा वापर करत आहोत.’

पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूचे कारण अयशस्वी रिलेशनशिप असल्याचे सांगितले आहे. आत्महत्येपूर्वी अभिनेत्री एका रिक्षामधून अपार्टमेंटमध्ये पोहोचली होती, अशीही माहिती मिळाली आहे. हे आत्महत्येचे प्रकरण आहे की अभिनेत्रीला आत्महत्येसाठी कोणीतरी प्रेरित केले आहे, याचाही पोलिस शोध घेत आहेत. पॉलिन जेसिका ही दीपा या नावानं ओळखली जात होती. तिनं अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here