Alzheimer’s Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

  0
  8


  Alzheimer’s Day 2022 : 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer’s Day) म्हणून ओळखला जातो. जागतिक अल्झायमर दिवस 2022 दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या आजारात रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि माणूस स्वत:कडे लक्ष देण्यासाठी असमर्थ होतो. अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली ह्या आजाराचा शोध लावला. 

  गेल्या काही वर्षांत, अल्झायमर हा एक सामान्य आजार म्हणून उदयास आला आहे. अल्झायमर हा एक प्रकारे मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचा मेंदू कमकुवत होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. पूर्वी हा आजार मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येत होता. परंतु, तणाव आणि नैराश्यामुळे आता तरुणांनादेखील या आजाराचा प्रादुर्भाव होतो. जागरूकतेचा अभाव हे देखील अल्झायमरच्या वाढीचे एक कारण आहे. ‘अल्झायमर दिनाच्या’ दिवशी लोकांना या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचारांबाबत जागरूक केले जाते. 

  जागतिक अल्झायमर दिवस का साजरा करावा?

  जागतिक अल्झायमर दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मानसिक आजार आहे, ज्याला लोक गांभीर्याने घेत नाहीत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, वयानुसार स्मरणशक्ती कमी होणे सामान्य आहे. हेच कारण आहे की, बहुतेक लोक उपचारांशिवाय अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्व विकारांना तोंड देत आहेत. केवळ भारतातच नाही तर इतर देशातील लोकही या आजाराकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकांची ही विचारसरणी बदलण्याच्या उद्देशाने दरवर्षी अल्झायमर दिवस साजरा केला जातो. याद्वारे, जागतिक स्तरावर लोकांना अल्झायमरची मुख्य लक्षणे, कारणे आणि उपचारांशी संबंधित माहिती दिली जाते.

  जागतिक अल्झायमर दिनाचा इतिहास काय?

  2012 पासून दरवर्षी जागतिक अल्झायमर दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वप्रथम अल्झायमरचा उपचार 1901 मध्ये एका जर्मन महिलेवर झाला होता. या आजारावर जर्मन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अलोइस अल्झायमर यांनी उपचार केले. त्यांच्या नावावरून या आजाराला ‘अल्झायमर’ असे नाव देण्यात आले. 21 सप्टेंबर 1994 रोजी जेव्हा अल्झायमर रोगाने 10 वा वर्धापन दिन साजरा केला तेव्हा दरवर्षी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक देशात अनेक जागरुकता मोहिमा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. अल्झायमर रोग हे जगभरातील मृत्यूचे सहावे प्रमुख कारण आहे. त्यामुळे या आजाराची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. 

  महत्वाच्या बातम्या :   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here