Attack On Hindu Temple In Birmingham Uk Hindu Temple Attack

  0
  6


  UK Hindu Temple Attack : ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बर्मिंघममध्ये जमावाकडून मंदिरावर हल्ला करत हिंदू विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वेस्ट मिडलँड्स शहरातील स्मेथविक परिसरातील स्पॉन लेन येथील एका दुर्गा मंदिरावर सुमारे 200 लोकांच्या जमावाने हल्ला केला. यावेळी हल्ला करणाऱ्या जमावाने घोषणाबाजी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये काही चेहरा झाकलेल्या लोकांचा जमाव मंदिराबाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे.

  दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या समुदायाने ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणाबाजी केली. तर काही आंदोलकर्त्यांनी मंदिराच्या आतमध्ये जाऊन नासधूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. या संदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही तोंड झाकलेल्या व्यक्ती मंदिरावर हल्ला करताना दिसत आहे. आंदोलकांनी मंदिरातील मुर्ती भंग करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याचं समोर येत आहे. 

  मीडिया रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅममधील दुर्गा मंदिराला मंदिरामध्ये एका हिंदू कार्यकर्ता भेट देणार होता. या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट समुदायाकडून ठरवून हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे. स्थानिक सँडवेल पोलिसांनी मंगळवारी ट्विट करत माहिती दिली की, एका हिंदू कार्यकर्त्याच्या भेटीमुळे मंदिराबाहेर हा निषेध करण्यात आला. मात्र, नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, साध्वी ऋतंभरा यांचा दुर्गा मंदिरामध्ये कार्यक्रम होणार होता, मात्र मंदिराबाहेर आंदोलन आणि निषेधानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे.

   

  महत्त्वाच्या इतर बातम्या

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here