Double XL Teaser Release Sonakshi Sinha And Huma Qureshi Movie

0
4


Double XL Teaser :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या  ‘डबल एक्सएल’ (Double XL) या चित्रपटाचा 30 सेकंदाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉडी शेमिंग आणि वाढलेलं वजन या विषयी बोलताना दिसत आहेत. 30 सेकंदाच्या टीझरमधील हुमा आणि सोनाक्षीच्या लूकनं आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

टीझरमध्ये सोनाक्षी आणि हुमा यांचा हटके लूक

बॉडी शेमिंग या गंभीर विषयाबद्दल अगदी मजेशीर पद्धतीनं बोलण्याऱ्या दोन मैत्रिणी  ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये हुमा ही निळा टुपीस आणि ब्लॅक जॅकेच अन् चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे तर सोनाक्षी ही पिंक टॉप व्हाईट जॅकेट आणि ग्रीन कलर हेअर अशा लूकमध्ये दिसत आहे. दोघींच्या हटके लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तगडी स्टार कास्ट

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  एका मुलाखतीत जहीरनं सांगितलं, ‘या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमा यांना वजन वाढवायचे होते. त्यांनी चित्रपटासाठी 15-20 किलो वजन वाढवले आहे. त्या शूटिंग दरम्यान फक्त खात होत्या.’ महत राघवेंद्र हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

पाहा टीझर : 

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

हुमा आणि सोनाक्षी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती 

डबल एक्सएल या चित्रपटातील हुमा आणि सोनाक्षी यांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हुमाच्या महारानी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली तसेच तिच्या बदलापूर, गँग्स ऑफ वासेपूर आणि जॉली एल एल बी या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Liger OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘लायगर’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहू शकणार चित्रपट? जाणून घ्या…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here