Koffee With Karan 7 Gauri Khan Talk About Aryan Khan Case Says

0
6


Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण-7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडमध्ये गौरी खान (Guari Khan) , भावना पांडे (Bhavna Panday) आणि माहीप कपूर (Maheep Kapoor) हे हजेरी लावणार आहेत. गौरीनं या एपिसोडनं आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिनं आर्यन, सुहाना आणि शाहरुख यांच्याबाबत कॉफी विथ करणमध्ये चर्चा केली. 

आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. आता या सर्व प्रकरणावर कॉफी विथ करणमध्ये गौरी खाननं प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘ कठीण काळात आमचे मित्र आणि अनेक लोक एकत्र उभे राहिले ज्यांना आम्ही ओळखत नाही ते लोक देखील आमच्यासोबत होते. आम्हाला यासाठी मदत केली त्या सर्वांचा मी आभारी आहे.’ पुढे गौरी म्हणाली, ‘एक कुटुंब म्हणून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या. आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.’ 

गौरीची मुलगी  सुहाना खान ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती द आर्चीज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ‘द आर्चीज’चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

गौरीनं सुहाना दिल्या डेटिंग टिप्स

काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा गौरीला प्रश्न विचारतो की, तू सुहानाला कोणती डेटिंग टिप देशील? करणच्या या प्रश्नाचं गौरी उत्तर देते, ‘कधीच एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको.’ गौरीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, ‘एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको’

  

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here