I Did Not Think That The Movie Ashi Hi Banwa Banwi Will Be Taken So Much By People Said Ashok Saraf

0
5


Ashok Saraf : ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa Banwi) या इतिहास घडवणाऱ्या सिनेमाला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज 34 वर्षांनंतरही या सिनेमातील कलाकार, गाणी, डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’च्या आठवणींना उजाळा देताना अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले आहेत,”सर्वांच्या मेहनतीमुळे एक चांगली कलाकृती बनली आहे”. 

आठवणींना उजाळा देताना अशोक सराफ म्हणाले आहेत,”अशी ही बनवाबनवी’ सारख्या सिनेमाचा भाग असल्याचा आनंद आहे. या सिनेमाला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही फार आनंद देणारी गोष्ट आहे. हा सिनेमा आजही त्याच आवडीने पाहिला जात आहे. यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही. सिनेमातील डायलॉग सर्वांनाच पाठ झाले आहेत. याचं कारण म्हणजे वसंत सबनीसांचं लेखन. वसंत सबनीसांचं लेखन, डायलॉग, पटकथेला तोडच नाही”.

अशोक सराफ पुढे म्हणाले आहेत,”अशी ही बनवाबनवी’ या सिनेमात माझ्यासह, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, सुशांत रे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे असे एकापेक्षा एक कलाकार आहेत. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. या सिनेमाच्या यशात सचिनचा मोलाचा वाटा आहे. सर्वांच्या मेहनतीमुळे एक चांगली कलाकृती बनली आहे”. 

‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हा सिनेमा लोकांना आवडेल? असा प्रश्न पडायचा. पण हा सिनेमा लोक एवढा डोक्यावर घेतील असं वाटलं नव्हतं. सिनेमातील डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. तसेच यातील गाण्यांवर आजही लोक नाचतात. सिनेमा म्हटलं की टीमवर्क आलं. टीमवर्क हे फार क्वचित जुळून येतं. ते या सिनेमाच्या बाबतीत झालं आहे. असं मला निश्चितपणे वाटतं. 

‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात मी स्वत: काम केलेलं असून आजही सिनेमा टीव्हीवर लागला असेल तर मी आवडीने पाहतो. सिनेमा जिथे सुरू असेल तिथून मी शेवटपर्यंत पाहतो. या सिनेमातील सर्वच डायलॉग मला आवडतात. सचिन आणि लक्ष्मीकांतने बायकांची भूमिका असूनही विभत्सता न आणता केली. त्यामुळे कोणालाही ती पाहायला आवडते. माझं पात्रं गोष्ट घडवणारं आहे. त्यामुळे ते आणखी लोकप्रिय झालं आहे. सिनेमाचं शूटिंगदेखील लक्षात राहण्यासारखं आहे, असं प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा म्हणाले आहेत. 

‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा सिनेमा आहे. या सिनेमाला आजही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. आजही हा चित्रपट टीव्ही लागला तरी प्रेक्षक आवडीने पाहतात. सचिन पिळगावकरांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Ashok Saraf : अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस; जाणून घ्या अशोक मामांबाबत 75 गोष्टी

Ashok Saraf : ‘वक्ख्या विक्खी वुख्खू’ ते ‘हा माझा बायको पार्वती’; अशोक सराफ यांचे गाजलेले डायलॉग्सSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here