Naga Chaitanya Reaction On Shodhita Dhulipala Post Goes Viral On Social Media

0
5


Naga Chaitanya : साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा, अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) पूर्वपत्नी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu)  घटस्फोट घेतल्यानंतर सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. नागा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मीडियात अधिक चर्चेत असतो. समंथापासून विभक्त झाल्यापासून नागा चैतन्य साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालाला (Shobhita Dhulipala) डेट करत असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून रंगल्या आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही अद्याप या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. असे असले, तरी त्यांच्या कृतीतून ते नेहमीच चाहत्यांना याचे संकेत देत असतात.

अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) 2017 मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. समंथापासून विभक्त झाल्यापासून नागा अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

नागाने केली पोस्ट लाईक!

शोभिता लवकरच ‘पोनियिन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओ पोस्टला सर्वसामान्यांपासून अनेक बड्या स्टार्सनी पसंती दर्शवली आहे. दरम्यान, नागा चैतन्यनेही शोभिताची पोस्ट लाईक केली आहे. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. शोभिताचा हा चित्रपट 30 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता यांचा रोमान्स या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झाला होता. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ‘आमच्या घटस्फोटानंतर, समंथा आता पुढे गेली आहे, मीही पुढे निघालो आहे आणि मला याबद्दल जगाला अधिक कहीही सांगायचे नाही.’

सामंथाही करतेय दुसऱ्या लग्नाचा विचार?

नागा चैतन्यच नाही तर, सध्या समंथा रुथ प्रभू देखील तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले होते की, अभिनेत्री समंथा प्रभू सद्गुरू जगदीश वासुदेव यांच्या सांगण्यावरून आयुष्यात पुढे जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार करत आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

‘पोन्नियिन सेल्वन’साठी चाहते आतुर!

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, जयम रवी आणि कार्थी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा: Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here