Why Entertainment Inflation For Rights Hemant Dhome Issue Has Been Decided By MI On ‘National Fandi Day’

0
5


Hemant Dhome : आज ‘राष्ट्रीय चित्रपट दिनी’ (National Cinema Day 2022) देशभरात विविध ठिकाणी 75 रुपयांत सिनेमे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करत प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

हेमंत ढोमे ट्वीट करत म्हणाला आहे,” आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. सगळीकडे मराठी सिनेमा हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?”

हेमंत ढोमे पुढे म्हणाला आहे,”चित्रपट हा चित्रपटगृहात बघण्याची मजाच वेगळी आहे. सिनेमा हा सगळ्यांसोबत, मोठ्या पडद्यावर अनुभवण्याचा कमाल अनुभव आहे. हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आज ‘राष्ट्रीय चित्रपट दिनी’ यावर ठोस पावलं उचलायला हवीत”. 

मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरनेदेखील पाठिंबा देत म्हटलं आहे,”सिनेमांची तिकीट योग्य दरात असतील तर जे लोक सिनेमाचं तिकीट खरेदी करू शकत नाहीत ते आज जात आहेत. आज जवळपास सगळ्या सिनेमांचे शो हाऊसफुल्ल आहेत”.

पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा अनेक ठिकाणी तिकीटांची किंमत 200-300 रुपये आहे. पण आज ‘राष्ट्रीय सिनेमा दिनी’ 4000 स्क्रीन्सवर प्रेक्षकांना 75 रुपयांत सिनेमा पाहता येत आहे. सर्व वयोगटातील मंडळींना एकत्र एकादिवशी सिनेमा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवली होती. पण आज अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 

संबंधित बातम्या

National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी खुशखबर! ‘राष्ट्रीय चित्रपटदिनी’ सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत

National Cinema Day 2022: राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट बघायचाय? असं बुक करा तिकीट

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here