Bollywood Actress Deepika Padukone Health Deteriorated Admitted To Hospital

0
13


Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहे. दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

रिपोर्टनुसार, दीपिकाची प्रकृती आता सुधारली आहे. तिच्या काही टेस्टदेखील करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीदेखील दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जून महिन्यात एका सिनेमांचं शूटिंग सुरू असताना दीपिकाची प्रकृती खालावली होती. त्यावेळीदेखील तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दीपिकाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘द इंटर्न’ या सिनेमात दीपिका दिसून आली होती. तसेच ‘पठाण’, ‘फायटर’, ‘प्रोजेक्ट’ हे दीपिकाचे आगामी सिनेमे असून या सिनेमांच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात दीपिका अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाचा एक वेगळी लुक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने दीपिकाचा लुक शेअर करत लिहिलं आहे,”तिला केवळ गोळीने घायाळ करण्याची गरज नाही”.

दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट

दीपिकाचा ‘पठाण’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत शाहरुख खानदेखील दिसणार आहे. दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा ‘पठाण’च्या माध्यमातून दोघे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ‘पठाण’ नंतर दीपिकाचा ‘फायटर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका ऋतिक रोशन सोबत दिसणार आहे. तसेच दीपिका प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’मध्येदेखील दिसणार आहे. 

संंबंधित बातम्या

Pathaan Poster : प्रतीक्षा संपली; ‘पठाण’ सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट

Ranveer Singh,Deepika Padukone : रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका झाली इम्प्रेस; अशी दिली रिअॅक्शन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here