Italy Pm Election Italy Set To Get First Woman Pm Far Right Leader Giorgia Meloni Wins Big In Polls

  0
  15


  Italy New PM : इटलीमध्ये (Italy) पुन्हा ‘मुसोलिनी’ शासन येणार आहे. इटलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंतप्रधानपदासाठीच्या निवडणुकीत कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या आणि मुसोलिनी समर्थक जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांचा विजय झाला आहे.  जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ आणि उजव्या विचारसरणीच्या युतीला निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या पंतप्रधान होणार आहेत. जॉर्जिया मेलोनी यांनी या निवडणुकीसाठी फोर्झा इटालिया आणि द लीग या पक्षांसोबत युती केली. मीडिया रिपोर्टनसुार मेलोनी यांच्या युतीला 43 टक्के मत मिळाली. 

  मुसोलिनी समर्थक जॉर्जिया मेलोनी होणार पंतप्रधान

  मेलोनी यांनी निवडणुकीपूर्वी फोर्झा इटालिया आणि द लीग यांच्याशी युती केली. मेलोनी यांच्या युतीला 43 टक्के मतं मिळाली. डाव्या विचारसरणीच्या पक्षाला 26 टक्के मतं मिळाली आहेत. 5 स्टार पार्टीला 15 टक्के मतं मिळाली. मेलोनी यांच्या युतीला संसदेत 114 सदस्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं. संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 जागांची गरज असते. मेलोनी यांनी या निवडणुकीत बहुमतानं विजय मिळवला.

  77 वर्षांत 70 वेळा बदललं सरकार

  जॉर्जिया मेलोनी यांच्या युतीने माजी पंतप्रधान मारियो द्राघी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. यासोबतच इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या सरकारचा मार्गही मोकळा झाला. इटलीमध्ये 1945 नंतर 2022 पर्यंत 77 वर्षात 17 व्या वेळी सरकार बदललं आहे. जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान झाल्यानंतर इटलीचा फॅसिस्ट हुकूमशाह बेनिटो मुसोलिनीच्या चर्चेलाही जोर आला. जॉर्जिया मेलोनी स्वतःला मुसोलिनी समर्थक मानते.

  कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?

  जॉर्जिया मेलोनी यांनी 2012 साली ‘ब्रदर्स ऑफ इटली’ (Brothers of Italy) या पक्षाची स्थापना केली. ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. मेलोनी यांच्या राष्ट्रवादी भुमिकेमुळे त्यांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. तर हुकुमशाह बेनिटो मुसोलिनीनंतर पहिल्यांदा इटलीमध्ये उजव्या विचारसरणीचं सरकार येणार आहे.

  समलैंगिकता, गर्भपात आणि युरोपीय संघाला विरोधी

  जॉर्जिया मेलोनी यांची समलैंगिकता, गर्भपात, निर्वासित आणि युरोपीय संघाला विरोधी आहे. युरोपीय संघ निर्वासितांच्या समस्येचं मूळ कारण असल्याचं मेलोनी यांचं मत आहे. याचा परिणाम युरोपीय संघावर (European Union) होणार आहे. मेलोनी यांच्या सरकारमध्ये इटली युरोपीय संघांमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय मेलोनी समलैंगिकतेविरोधी आहेत.

     Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here