Karan Johar Spoke About His Relationship On Asking By Tanmay Bhat In Koffee With Karan 7

0
15


Koffee With Karan 7: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण-7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनचा शेवटचा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शेवटच्या एपिसोडमध्ये कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे सहभागी होणार आहेत. या एपिसोडमध्ये हे सर्व सोशल मीडिया स्टार करणला काही अतरंगी प्रश्न विचारताना दिसणार आहेत. 

तन्मयचा प्रश्न अन् करणचं उत्तर 
कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कुशा कपिला ही करणला त्याच्या एक्सबाबत विचारते. कुशा म्हणते, ‘वरुण धवनला तुझ्या एक्सबाबत माहिती आहे’ यावर तन्मय म्हणतो, ‘तू डेविड धवन यांना डेट करत होतास का?’ यावर करण म्हणतो, ‘नाही, मी डेविड धवन यांना डेट करत नाही’ त्यानंतर शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा कॉफी विथ करण-7 च्या शेवटच्या एपिसोडचा प्रोमो-


कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. हा कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनचा 13 वा एपिसोड असणार आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.  डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा एपिसोड पाहू शकता. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, ‘एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here