Nasa Double Asteroid Redirection Test Today Dart Planned Collision With Dimorphos Asteroid

  0
  198


  Nasa DART Mission : पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासानं (NASA) आज एक मोठी मोहिम फत्ते केली आहे. पृथ्वीला ॲस्ट्रॅायडच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नासानं ‘डार्ट मिशन’ (DART Mission) यशस्वीरित्या राबवलं आहे. या मिशन अंतर्गत नासाचं डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट (Double Asteroid Redirection Test) उल्केवर आदळलं आहे. नासानं अवकाशात फिरणाऱ्या डायमॅारफस (Dimorphos) लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली आहे. अवकाशातील लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका उद्भवू शकतो. अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकते. हे टाळण्यासाठी नासाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचा एक भाग म्हणजे ही एक चाचणी होती. त्यामुळे नासाचं हे मिशन फार महत्त्वाचं होतं आणि ते यशस्वी झालं आहे. डायमॅारफस (Dimorphos) नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर झाली. 

  डार्ट अंतराळयानाला धडकलेल्या लघुग्रहाची लांबी 169 मीटर होती. या धडकेमुळे लघुग्रहाची दिशा आणि वेग बदल्यात मदत झाली. अमेरिकन अंतराळसंस्था नासाची ही मोहीम यशस्वी झाल्याने आता भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह नष्ट करता येतील किंवा त्यांची दिशा बदलता येईल.

  भविष्यात लघुग्रह नष्ट करण्यासाठी होणार मदत

  नासाने आज पहाटे ही मोहीम यशस्वी केली. भारतीय वेळेनुसार, 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 4.45 वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॅारफस (Dimorphos) ॲस्ट्रॅायडसोबत टक्कर झाली. यामध्ये नासाचं अंतराळयान नष्ट झालं आहे. पण ॲस्ट्रॅायडचा वेग आणि दिशा बदलण्यात नासाला यश आलं आहे. नासानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

  नासा अंतराळ संस्थेने पृथ्वीला लघुग्रहापासून वाचवण्यासाठी यशस्वी चाचणी घेतली आहे. याला डार्ट मिशन असं नाव देण्यात आलं होतं. प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टम (DART) मोहीम यशस्वीपणे पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा फायदा भविष्यात कोणताही लघुग्रह नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. नासाला पृथ्वीच्या जवळ अंतराळ फिरणारे 8000 निअर अर्थ ऑब्जक्ट्स (NEO) आढळले आहेत. हे ॲस्ट्रॅायड म्हणजे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.  

  काय आहे डार्ट मिशन? (What is Dart Mission) 

  पृथ्वीला अवकाशात फिरणाऱ्या लघुग्रहांपासून मोठा धोका आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाला पृथ्वीच्या दिशेने येणार्‍या धोकादायक लघुग्रहाची दिशा बदलता येईल का याची चाचणी करायची होती. यासाठी नासाने डार्ट मिशान हाती घेतलं. त्या अंतर्गत ही पहिली डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन चाचणी यशस्वी झाली आहे. दररोज अनेक लहान-मोठे लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. यापैकी बहुतेक वातावरणाच्या घर्षणाने नष्ट होतात. पण अनेक लघुग्रह अजूनही अवकाशात अस्तित्वात आहेत, जे पृथ्वीसाठी धोकादायक आहेत. या लघुग्रहांना नष्ट करण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.

  महत्त्वाच्या इतर बातम्या

  NASA DART Mission : पृथ्वीला वाचवण्याची मोहीम यशस्वी! ॲस्ट्रॉयडवर आदळले नासाचे अंतराळ यान 

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here