Siddharth Jadhav Wil Be Seen With South Superstars In Upcoming Silent Film Gandhi Talks Teaser Release

0
55


Gandhi Talks : आपला लाडका सिद्धू अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लवकरच साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे. ‘गांधी जयंती’चं निमित्त साधत झी स्टुडीओने त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मूकपट असणार आहे. ‘गांधी टॉक्स’ (Gandhi Talks) नावाच्या या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) , अरविंद स्वामी (Arvind Swami) आणि अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची झलक शेअर करण्यात आली आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा हा टीझर पाहता हा चित्रपट पैशाच्या खेळावर आधारित असणार आहे, असे वाटतेय. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक लघुपट असणार आहे, जो कोणत्याही संवादाशिवाय तयार करण्यात आला आहे. अर्थात हा एक मूकपट असणार आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर मूकपट अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘गांधी टॉक्स’ हा एक डार्क कॉमेडी चित्रपट असणार आहे.

पाहा टीझर :

‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मूव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विजय सेतुपतीसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी आदी कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे.

या चित्रपटाचा टीझर रिलीज करताना, अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. चित्रपटाचा टीझर समोर येताच चाहत्यांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच दिवसांनी आलेला हा मूकपट चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे. यासोबतच अभिनेत्याच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाचे कौतुक करत आहे.

कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

अभिनेता सिद्धार्थ जाधवला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी केवळ चाहतेच नव्हे, तर कलाकार देखील त्याचे कौतुक करून त्याला शुभेच्छा देत आहेत. ‘जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी,जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी…..अभिनंदन सिद्धू दादा’, अशी कमेंट एका चाहत्यानी केली आहे. ‘थांबायचं नाय गड्या आता थांबायचं नाय..खूप शुभेच्छा मेरी जान’, असे म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने लाडक्या मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदे, सोनाली कुलकर्णी, लोकेश गुप्ते, प्रसाद ओक, शशांक केतकर अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत सिद्धार्थ जाधवला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

Siddharth Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी ‘बिग बॉस’च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रियाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here