The Bang Of Ponniyin Selvan 150 Crore Mark Was Crossed Worldwide In Two Days

0
41


Ponniyin Selvan 1 Box office Collection : ‘पोन्नियिन सेलवन 1’ (Ponniyin Selvan 1) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. मणिरत्नमने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. 

‘पोन्नियिन सेलवन 1’ हा सिनेमा 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. जगभरात हा सिनेमा तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने जगभरात 80 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 150 कोटींची कमाई केली आहे.


‘पोन्नियिन सेलवन 1’ हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात विक्रम, जय रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. तर एआर रहमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. ‘पोन्नियिन सेलवन’ हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. ‘पोन्नियिन सेलवन’चा दुसरा भाग नऊ महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दोन भागांत रिलीज होणार ‘पोन्नियिन सेल्वन’ 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Vikram Vedha Vs Ponniyin Selvan : वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर! ‘विक्रम वेधा’ की ’पोन्नियिन सेल्वन’ कोण मारणार बाजी?

Ponniyin Selvan I: ‘पोन्नियिन सेल्वन’ अवघ्या 100 रुपयांमध्ये बघता येणार? मणिरत्नम यांची मल्टिप्लेक्सच्या मालकांकडे मागणी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here