46 Girls Women Among 53 Killed In Kabul Education Centre Bombing  

  0
  16


  Kabul Bomb Blast :  अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पश्चिम काबूलमधील शाहिद माजरी रोडवरील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 46 मुली आणि महिलांचाही समावेश आहे. तर जवळपास 80 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तीन दिवसातील हा दुसला मोठा बॉम्बस्फोट आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
   
   एएफपी या वृत्तसंस्थेने युएनच्या अहवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिमेकडील एका वस्तीला लक्ष्य केले आणि हा स्फोट घडवून आणला. दोन दिवसांपूर्वीच काबूलमधील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला होता. या आत्मघातकी हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची होता. तर आजच्या स्फोटात 53 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 46 मुलींचा समावेश आहे.  

  काबूलमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. शहीद मजारी परिसरात हजारा समाजाचे लोक राहतात, तेथेच हा स्फोट झालाय. दरम्यान, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या स्फोटाबाबत कोणतेही अधिकृती माहिती जारी केलेली नाही. 

  अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर वाढत्या दहशतवादी घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून अफगाणिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटांच्या घटना घडत आहेत. या दोन दिवसांत घडलेल्या या घटनांनी अफगाणिस्तान पुरता हदरला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील एका शाळेतच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिय सुरू असताना आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता हा बॉम्बस्फोट झाला आहे. 

  या शिवाय गेल्याच महिन्यात काबूलध्येच मशिदीत केलेल्या बॉम्बस्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 40 जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठण करत असताना स्फोट झाला होता. 

  महत्वाच्या बातम्या

  Kabul Bomb Blast : अफगाणिस्तान हादरलं! काबुलमधील शाळेत बॉम्बस्फोट, 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू  

  Kabul Blast: अफगाणिस्तानमधील मशिदीतील बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, स्फोटाची जबाबदारी कुणाची? 

   

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here