Aamir Khans Daughter Ira Khan Flaunts Her Engagement Ring On Social Media

0
16


Ira Khan Engagement Ring : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) एंगेज झाली आहे. तिने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून आयरा आणि नुपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान नुपूरने आयराला प्रपोज केले आणि गुडघ्यावर बसून, अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता आयराने तिची अंगठी फ्लाँट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती नुपूरसोबत समुद्रकिनारी भटकंती करताना दिसत आहे. दोघेही आपली डेट एन्जॉय करत आहेत.

आमिर खानची लेक आयरा मागील बऱ्याच काळापासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर आयराने स्वतः सोशल मीडियावर या खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आयराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. तर, आता तिने आपल्या एंगेजमेंट रिंगची झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओत आयरा खान आणि नुपूर शिखरे एकत्र हँग आऊट करताना दिसत आहेत. या व्हिडीओची सुरुवात देखील नुपूरच्या हटके प्रपोजने होते. त्यानंतर आयरा तिची अंगठी दाखवते. दोघेही एका पार्कमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवतात. या व्हिडीओमध्ये त्यांच्या या सुट्टीतील अनेक थ्रोबॅक फोटो देखील आहेत. नूपुर आणि आयराने एकत्र सायकल देखील चालवली आहे. दोघेही एकत्र जेवताना दिसले. एका फोटोत आयरा नुपूरला कीस करताना देखील दिसली. नूपुरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दोन वर्षांपासून सुरु आहे डेटिंग!

आयरा आणि नुपूर दोघेही 2020पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही त्यांच्या क्यूट आणि रोमँटिक फोटो-व्हिडींओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तिने 2019मध्ये थिएटर प्रोडक्शन हाऊस ‘युरिपाइड्स’ मीडियाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

हेही वाचा :

आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट, म्हणाली….

Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक ‘या’ गंभीर आजाराशी देतेय झुंजSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here