ICC Womens T20 World Cup 2023 Schedule Check Full List Of Fixtures Womens T20 WC

  0
  16


  ICC Women’s T20 World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने महिला टी20 वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. या विश्वचषकात दहा महिला संघ सहभागी होणार आहेत. भारताच्या ग्रुपमद्ये  पाकिस्तान, वेस्टविंडीज, इंग्लंड आणि आयरलँड या संघाचा समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ असतील. अ आणि ब असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. आयसीसीनं जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, दहा फेब्रुवारीपासून महिला टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.  

  भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये –
  पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये महिलांचा टी 20  सामना रंगणार आहे. फायनल 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन ग्रुपमध्ये सामने होणार आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ असतील. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, न्यूजीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप ब मध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट विंडीज, इंग्लंड आणि आयरलँड या संघांना ग्रुप ब मध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साखळी फेरीत सामना होणार आहे. केपटाऊनमध्ये विश्वचषकाचा फायनल सामना रंगणार आहे. पुरुष टी २० विश्वचषकानंतर महिलांचा विश्वचषकाचा थरार पाहायला मिळणार आहे. 
   
  दक्षिण आफ्रिकामध्ये आयसीसीनं महिला टी २० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यावेळी भारताची माजी कर्णधार आणि आयसीसीची राजदूत मिताली राजही उपस्थित होती.  वेळापत्रकाची घोषणा आपल्याला टी २० विश्वचषकाजवळ घेऊन जात आहे.  दक्षिण आफ्रिकामध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतील, अशी मला आपेक्षा आहे, असे मिताली राज म्हणाली. 

  दरम्यान, ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली होती. आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर नाव कोरण्याच्या इराद्यानं भारतीय संघानं तयारी सुरु केली असेल. 

  हे देखील वाचा – 

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here