Alia Bhatt On Maternity Leave Take A Break For One Year After The Birth Of The Baby

0
1162


Alia Bhatt Pregnancy Update : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. तर जूनमध्ये आलियाने चाहत्यांना गोड बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून आलिया आगामी सिनेमांच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर आलिया एक मोठा ब्रेक घेणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आलिया तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिने मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने बाळाच्या जन्मानंतर वर्षभर मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आलियाने तिच्या आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आलियासारखं रणबीरदेखील सिनेमांमधून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच आलियाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींसोबत हा कार्यक्रम पार पडला आहे. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 


आलिया-रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांचे चांगलीच कमाई केली. आता आलिया-रणबीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राच्या ‘जी ले जरा’ या सिनेमातदेखील आलिया झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Baby Shower: आलिया भट्टच्या बेबी शॉवरची झलक, दिसली देसी अवतारात!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here