Gangubai Kathiawadi Alia Bhatt Style Hit Abroad Models Walked The Ramp In Gangubai Getup

0
10


Alia Bhatt Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. तिचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाची क्रेझ देश-विदेशात पाहायला मिळत आहे. 

आलियाच्या गंगूबाईची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्स गंगूबाईच्या गेटअपमध्ये रॅम्पवॉक करताना दिसून आल्या. गंगूबाईसारखा पेहराव मॉडेल्सने केला होता. गंगूबाईसारख्या बांगड्या, टिकली, झुमके, आणि काळा चष्मा या मॉडेल्सने रॅम्पवॉक करताना लावला होता. फक्त गंगूबाईच्या साडीची जागा गाऊनने घेतली.

फॅशन शोदरम्यानचे गंगूबाईच्या लूकमधले मॉडेल्सचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मिस स्टार मलेशिया 2022 ने हे फोटो शेअर करत लिहिलं आहे,”सन्मानाने जगण्यासाठी कोणाला घाबरू नका”. गंगूबाईचा इंडो-वेस्टर्न लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात आलिया भट्टसोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भन्साळींनी सांभाळली आहे. अनेक बिग बजेट सिनेमांना ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाने टक्कर दिली आहे. 


‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचं कथानक काय?

‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’वर आधारित आहे. गंगूबाईला तिच्या बॉयफ्रेण्डने 1000 रुपयांमध्ये मुंबईतील कामाठीपुरामध्ये विकलं होतं. यानंतर तिने महिलांसाठी लढण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी तिने लढा दिला. 

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here