Harry Potter Carry On Star Leslie Phillips Died At Age Of 98

0
13


Leslie Phillips: ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅरी ऑन या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांना पसंती मिळाली. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते  लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची माहिती एजंट जोनाथन लॉयड यांनी दिली. त्यांनी सांगितलं की,  लेस्ली फिलिप्स यांनी झोपेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन स्ट्रोक आले होते. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळातील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपट, टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्ये काम केलं आहे. 

लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी  लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर, लेस्ली फिलिप्स यांनी ‘डॉक्टर इन द हाऊस’, टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार. 2006 च्या व्हीनस चित्रपटात पीटर ओ टोल सोबतच्या त्यांच्या सहाय्यक कामगिरीबद्दल त्याला बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘एम्पायर ऑफ द सन’ आणि सिडनी पोपच्या ‘आउट ऑफ आफ्रिका’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 9 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here