PAK Vs NZ T20 World Cup 2022 1st Semi-Final New Zealand And Pakistan Playing 11 Sydney Cricket Ground, Sydney

  0
  9


  New zealand vs Pakistan T20 world Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकुयात.

  न्यूझीलंडचा संघानं ग्रुप 1 मधील पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. या स्पर्धेतील न्यूझीलंडच्या संघानं एकच सामना गमावला तर, त्यांचा एक सामना अनिर्णित ठरला होता. दुसरीकडं पाकिस्तानच्या संघानंही ग्रुप 2 मधील तीन सामने जिंकले आहेत. परंतु, दोन सामन्यात पाकस्तानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होतं. 

  दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही
  न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-20 विश्वचषकातील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. दरम्यान,  या सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. दोन्ही संघ आपपल्या मागच्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहेत. 

   संघ-

  न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
  फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

  पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
  मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

  टी-20 विश्वचषकातील नॉक आऊट सामने-

  सामना संघ तारीख वेळ
  पहिला सेमीफायनल न्यूझीलंड vs पाकिस्तान 09 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30
  दुसरा सेमीफायनल भारत vs इंग्लंड 10 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30
  फायनल 13 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here